Saturday, January 21, 2017

धर्मांच्या मढ्यावर

"आठ साल की उम्र में ज़बानी याद है क़ुरान"



या असल्या बातम्यांमधून नेमके काय सांगायचे असते यांना काय माहित?

कुराण, गीता, बायबल इत्यादी पाठ आहे... बरं मग??

नुसते पाठांतर करून त्याचा अर्थ कळतो? आणि अर्थ कळला तर आपण ही पुस्तके वाचण्यात आयुष्य आणि श्रम वाया घालवले.. हे कळल्यावर काही उपरती होते?

मुलांना विज्ञान शिकवावे, कला शिकवाव्या.... वेदशाळा, मदरशात जाणाऱ्या मुलांना काय आधुनिक जग कळावे??? आणि त्या बौद्ध मठात लहानपणी जाऊन चाके फिरवून कसले घंटा ज्ञान मिळणार? वासनांवर विजय मिळवायला, आधी वासना काय असतात हे तरी कळायची अक्कल असावी लागते.

पण नाही... आम्ही धर्मांच्या मढ्यावर आमच्या येणाऱ्या पिढ्यांची फुले डोळे झाकून वाहत राहू!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १८ नोव्हेंबर २०१६, २२.५८ )
 

No comments:

Post a Comment