जीवलग मैत्रिणी सोबत मरीन ड्राइव्ह वर गप्पा आणि वॉक, महेश लंच होम मध्ये छानशी व्हाईट वाईन आणि सीफूड हे सगळे करून कॅब ने येताना ती काही सुंदर शायरी वाचून दाखवत होती. मी हळूच खिशातून मोबाईल काढला आणि YouTube वर 'हम दोनो' मधले गाणे रफींचे सुप्रसिद्ध गाणे "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" लावले, आणि तिच्या सहित वयस्कर ड्रायव्हरच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंद फुलून आला.
आतापर्यंतचे 'हम दोनो' आता 'हम तिनों' झाले होते आणि एका सुरात रफींना दाद आणि साथ देत होतो. मग ड्रायव्हर चाचांची पुढची फर्माइश आली "मेरे पिया गये रंगून", ते मी लावले आणि मी त्या कॅबचा VJ झालो. मागून राज कपूरचे "चलत मुसाफिर मोह लिया रे" झाले आणि तिने हळूच चाचांना विचारले "आपकी नर्गिस कौन है?" त्यावर चाचा सुद्धा मस्त लाजले. पुढचा प्रश्न माझा होता "नर्गिस मिली नहीं ना?".
चाचा थोडे शांत झाले आणि म्हणाले "जब कोई मिल जाता है तो जिंदगी का पन्ना पलट जाता है। जो मिलता नहीं वो हमेशा याद रहता है।"
चाचांसोबत मस्त सेल्फी काढून घेतली, या सुंदर वाक्यासाठी आणि अनुभवासाठी! जियो चाचाजान !!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २३ नोव्हेंबर २०१६, २३.५० )
चाचांसोबत मस्त सेल्फी काढून घेतली, या सुंदर वाक्यासाठी आणि अनुभवासाठी! जियो चाचाजान !!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २३ नोव्हेंबर २०१६, २३.५० )
No comments:
Post a Comment