मोदींनी कधी काळी केरळची सोमालिया शी तुलना केली होती.... HDI बाबतीत केरळ सोमालिया सोडा, बाकीच्या भारताच्या सुद्धा कित्येक पुढे आहे.
बाकी चलनबदली च्या मूर्खतापूर्ण निर्णयाने भारतात ठिकठिकाणी सोमालिया सारखी लुटालूट सुरु झालीय. खात्यात, खिशात पैसे असूनही लोक कंगाल झालेत, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होतोय, औषधे-दळणवळण आदी अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाहीयेत. आणि त्यात देशाचा वित्तमंत्री सांगतोय कि ATM मध्ये 2000 च्या नोटा यायला अजून 2-3 आठवडे लागतील!
2-3 आठवडे सोडा, अजून 2-3 दिवस जरी लोकांना पैसे नाही मिळाले तर लोक लुटालुटीवर उतरतील, अंतर्गत बंडाळी सदृश्य स्थिती निर्माण होईल. आणि सगळा देश या तुघलकी फर्मानाने होरपळत असताना PM जपान मध्ये भाषणे ठोकत फोटो काढून घेतायत.
मूर्खांच्या हाती सत्ता असली की अनर्थ हे असे होतात!!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १२ नोव्हेंबर २०१६, १९.५३ )
No comments:
Post a Comment