Saturday, January 21, 2017

अतिविद्वान अर्थतज्ज्ञ

काल दुपारी 3.30 ला मुंबईत हवाईमार्गे उतरलो. लगोलग उबर च्या आरामशीर SUV (फुकट car upgrade मिळतात मला, माझ्या ratings मुळे आणि सतत Uber वापरल्याने. भाडे Indica चे पडते) ने Eastern Express Highway मार्गे अगदी 30-35 मिनिटांत नव्या मुंबईत ऐरोलीला पोचलो. थोडा वेळ थांबून ऐरोलीतूनच शिवनेरीच्या Volvo ने पुण्याला प्रयाण केलं.

कधीही मुंबई न पाहिलेली बायको सहज म्हणाली "हे लोक उगीचच का म्हणतात का मुंबईत खूप गर्दी आहे म्हणून? हैद्राबाद सारखं तर आहे की!"

खरं सांगतो माझी बायको मला "5 रुपयांत मुंबईत भरपेट जेवण करता येते" म्हणणाऱ्या राज बब्बर, "कुठे कुणाला कसली अडचण झाली नोटबंदीने?" म्हणणाऱ्या शहरी भक्त आणि दारिद्रयरेषेची व्याख्या "दरडोई 32 रुपये" अशी करणाऱ्या अतिविद्वान अर्थतज्ज्ञांच्या रांगेत बसल्यासारखी वाटली !

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १० डिसेंबर २०१६, ०७.३१ )

No comments:

Post a Comment