आयुर्वेद हे असे शास्त्र(?) आहे जे फक्त वाटच पाहत असते मॉडर्न मेडिसिन ने काही शोध लावायचा... त्यांचे वाक्य तयार असते "आयुर्वेदात हे आधीच सांगितलंय!"
.
.
हिमोग्लोबिन काय असते ते आयुर्वेद सांगणार नाही, पण हिमोग्लोबिन चा शोध लागला की Hb वाढवणारी औषधे तयार! कोलेस्टेरॉल काय असते आयुर्वेदाला माहित नव्हते, पण कोलेस्टेरॉल चा शोध लागला की त्याला कमी करणारी औषधे लागलीच हजर!!
.
.
हिमोग्लोबिन काय असते ते आयुर्वेद सांगणार नाही, पण हिमोग्लोबिन चा शोध लागला की Hb वाढवणारी औषधे तयार! कोलेस्टेरॉल काय असते आयुर्वेदाला माहित नव्हते, पण कोलेस्टेरॉल चा शोध लागला की त्याला कमी करणारी औषधे लागलीच हजर!!
जगातला कुठल्याही आजारात नवे संशोधन येऊ द्या... आयुर्वेदात ते आधीच सांगितलेले असते बरं का! ते फक्त मॉडर्न मेडिसिन ला ते कळायची वाट पाहत असतात :)
"आयुर्वेदिक औषधांचे side effect होत नाहीत" ही अजून एक लोणकढी थाप तर तयार असतेच. आधुनिक वैद्यकाचे प्रत्येक औषध बाजारात यायच्या आधी clinical trials मध्ये त्याचे हजारो माणसांवर प्रयोग केले जातात, शास्त्रीय पद्धतीने त्याचे परिणाम-दुष्परिणाम नोंदले जातात. म्हणून मॉडर्न औषधे प्रामाणिकपणे सगळे गुणदोष ती घेणाऱ्यांना, लिहून देणाऱ्या डॉक्टरांना सांगतात. आयुर्वेदिक औषधांच्या असल्या clinical trials होतच नाहीत, त्यामुळे ना त्याचे चांगले परिणाम माहित, ना वाईट. आणि जर वाईट परिणाम पाहायचेच असतील तर विषशास्त्रातली बहुतांश नैसर्गिक विषे अभ्यासावीत, त्यातली कित्येक विषे ही औषध म्हणून आयुर्वेद आणि होमिओपॅथीत कमी डोस मध्ये वापरतात.
आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे कुठल्याही अर्थाने शास्त्र नाही. आणि यांना जगवण्यात खूप लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत म्हणून ते किमान भारतातून तरी वैद्यकशास्त्राच्या कक्षेतून बाहेर जाणार नाहीत. अज्ञानात इथे सुख आहे!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ८ नोव्हेंबर २०१६, १८.२३ )
(टीप: आयुर्वेद किंवा होमिओपॅथी च्या समर्थकांनी आधी clinical trials चा सविस्तर अभ्यास करावा आणि मग अभ्यासपूर्ण मते नोंदवावीत. अमक्या-तमक्याचा किंवा माझा अमुक आजार आयुर्वेदाने बरा झाला असा दावा करणाऱ्यांनी सोबत placebo आणि रिसर्च मधील statistical importance, p-value, confidence interval आदी गोष्टी वाचाव्यात ही विनंती )
No comments:
Post a Comment