नमोजींच्या कालच्या पानभर जाहिरातीला उत्तर म्हणून हा फोटो, ही जाहिरात आता सगळीकडे ढाल म्हणून वापरला जाईल. पण, शहाणी लोक फक्त फोटो पाहत नाहीत तर बाकीचे details पण पाहतात. हि जाहिरात ज्या Chicago Telephone & Radio Co. ने छापलीय, ती छापलीय 1936 साली, जेव्हा त्या कंपनीचे नाव बदलले गेले होते.
पुरावा 1: जाहिरातीत कंपनी established in 1909 असं स्पष्ट लिहिलंय आणि हे पण कि गेले 27 वर्षे ते public speaking शी संबंधित उपकरणे विकतायत म्हणजे साल आले 1936.
पुरावा 2: मोटवाने नावाच्या गृहस्थांनी स्थापन केलेली ही कंपनी, तिची 1909 मधली स्थापना आणि 1936 मधला नावाचा बदल हे त्यांच्या website वर आहे. ही लिंक पहा-
http://
तेव्हा भाऊ, 1936 ला नेहरू पंतप्रधान नव्हते, ना नेहरूंनी Chicago Radio Co च्या ब्रँडचा कलर चा सूट घालून खास फोटोसेशन केलंय त्यांच्यासाठी, जसे काल नमोजींनी केलेय. त्यांच्या सभेतील फोटो या कंपनीने छापलाय, नेहरूंबद्दल कुठलेही भाष्य न करता जसे की "नेहरूंचे स्वातंत्र्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करतोय" वगैरे.
पण काल Jio वाल्यानी सरळ "आम्ही पंतप्रधानांचे Digital India चे स्वप्न पुरे करतोय" म्हणून थेट PM लाच आपल्या ब्रँडच्या logo च्या रंगाचे जाकीट घालून उभा करून जाहिरातीत मॉडेल बनवलय.
बाकी 1936 सालाच्या आसपास किंवा कदाचित आधीच नेहरू कुटुंबाने वडिलोपार्जित गडगंज संपत्ती देशाला दान केलेली होती आणि कमला नेहरू सुद्धा खादीच्या साड्या वापरत होत्या. इकडे नमोजी वरचेवर लाखो रुपयांचे महागडे डिझायनर सूट वापरायला लागलेत.
नेहरू काही गरीब किंवा लाचार नव्हते की कुणाच्या खाल्ल्या मिठाला जागावे म्हणून त्याच्या जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून उभे राहावे. आणि पंतप्रधानपदी असताना खासगी कंपनीसाठी मॉडेलिंग करायला महामूर्ख तर बिलकुलच नव्हते.
नेहरूंचे, गांधींचे कुठलेही फोटो घेऊन (आणि बऱ्याचदा फोटोशॉप करून) विनासंदर्भ, काहीही खोटे निष्कर्ष काढून त्यांचं चारित्र्यहनन करणे हे फक्त संघीच करू शकतात. स्वातंत्र्यलढ्यात आपले शुन्य योगदान आणि ब्रिटिशांची केलेली मदत लपवायला राष्ट्रवादाचा मुखवटा लागतो... आणि जेव्हा तो मुखवटा चढवायला सुद्धा एकही लायकीचे तोंड सापडत नाही तेव्हा मग ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात लक्षणीय योगदान दिले त्यांची निंदानालस्ती करणे हा संघाचा अजेंडा नवा नाही!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ३ सप्टेंबर २०१६, ०७.१९ )
No comments:
Post a Comment