Wednesday, January 4, 2017

पितृभक्ती

जिवंतपणी आई-बापांना एकटे टाकून त्यांची आर्थिक-शारीरिक आबाळ करणारी, इस्टेटीसाठी त्यांच्या मरणाची वाट पाहणारी, वृद्धाश्रमात रवाना करून जबाबदारी झटकणारी, त्यांच्या आजारपणात/अपंगत्वात पूर्णपणे दुर्लक्ष करणारी, परंतु आई-बाप वारल्यावर गळे काढणारी आणि जंगी श्राद्ध घालून प्रेमाचे प्रदर्शन करणारी खूप कुटुंबे पाहिलीत.

पण, अंथरुणाशी खिळलेल्या बापासाठी परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी सगळ्या तडजोडी करत १९ वर्षे बापाची दररोज सर्वतोपरी काळजी घेणारा आधुनिक श्रावणबाळ मी सुनीलभाऊंच्या रूपाने पाहिलाय.

सुनील गजाकोश  भाऊ, तुमच्या इतका कर्तव्यनिष्ठ पुत्र आणि माणूससुद्धा मी माझ्या आयुष्यात कधीही पहिला नाहीये!

सलाम बाबांच्या स्मृतीला आणि तुमच्या पितृभक्तीला _/\_

- फेसबुक पोस्ट ( १३ सप्टेंबर २०१६, २०.४० ) 

No comments:

Post a Comment