Wednesday, January 4, 2017

धार्मिक विधी

शहाण्या माणसाने आपापले धार्मिक विधी, सणवार स्वतःच्या घरात करावेत, त्याला सार्वजनिक रूप देऊन त्यासाठी वर्गणी/चंदा/डोनेशनरुपी भीक/खंडणी मागत समाजाला वेठीला धरू नये. धार्मिक उत्सवा आडून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करू नये कारण सगळेच धर्म किंवा राजकीय पक्ष किती लायकीचे आहेत ते आपण सगळे जाणतोच.

समाजाला सहभागी करायचंच असेल तर शेजापाजारी मोदक, मटण बिर्याणी, शिरखुर्मा, खीर, हलीम, सुकामेवा, मिठाई, दारू आदी रुचकर पदार्थ, पेय वाटावीत. खाणाऱ्याच्या, पिणाऱ्याच्या शुभेच्छा भरभरून मिळतील. बाकी कुठल्याही गल्लीबोळाच्या राजाचा, सत्य-असत्य बाबाचा, वली-भन्ते-पादरी-श्रीश्री-१००८ आदी लोकांचा आणि त्यांच्या समस्त धर्मांचा जगाला (अपवाद-फुकट्या पुरोहितांचा) आजवर काडी उपयोग झालेला नाहीये!

- फेसबुक पोस्ट ( १५ सप्टेंबर २०१६, ०५.३५ ) 

No comments:

Post a Comment