Wednesday, January 4, 2017

काही ऐकीव ऐतिहासिक वाक्ये

काही ऐकीव ऐतिहासिक वाक्ये - आजच्या काही नेत्यांनी बालपणी केलेली आणि त्यांच्या आयांच्या निवडक तात्कालिक प्रतिक्रिया

१. तो: मला कोशिंबीर खूप आवडते. मला दही अजिबात आवडत नाही.
आई: बाळा, एकदा तरी खरं आणि कळेल असं स्पष्ट बोलत जा रे!

२. तो: मग मी त्या भल्या मोठ्या अजगराच्या तोंडात हात घालून त्याच्या टाळूला गुदगुल्या केल्या. तो अजगर हसून हसून मेला!
आई: पचेल एवढं खोटं बोलावं बाळ.

३. तो: आई, मला जिभेने कोपर चाटता आलं तर मी पंतप्रधान होणार ना?
आई: कप्पाळ माझं!!!

४. तो: मला राष्ट्रपती व्हायचंय, पंतप्रधान पण, मुख्यमंत्री पण, आमदार पण, नगरसेवक पण!
आई: होशील हो... (मनात- रेल्वेचा TC झाला तरी नशीब माझं!)

५. तो:
आई: बाळा, कधी तरी बोल रे!!!

६. तो: आई, गळा खाजीवता है!

७. तो: मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम हैं,
नेहरूचाचा बोलते आराम हराम है!

- फेसबुक पोस्ट ( १८ सप्टेंबर २०१६, १२.०५ ) 

No comments:

Post a Comment