Wednesday, January 4, 2017

बकरी ईद

ढाक्यात बकरी ईद ला मुसलमानांनी वाहिलेले रक्ताचे पाट पाहिले... खऱ्या फोटोना नाकारण्याचा पुरोगामी लोकांचा केविलवाणा अट्टाहास पण पाहिला. आणि त्या अट्टाहासाला पाठबळ म्हणून ईस्लामी विद्वानांचे हिरव्या tone चे फोटोशॉप केलेले फोटो पण पाहिले.

बकरी ईद आणि कुर्बानी हा सरळ सरळ मूर्खपणा आहे !!!

आता, या ढाक्यात वाहिलेल्या रक्तमिश्रित लाल पाण्याने कृतकृत्य झालेल्या हिंदुत्ववादी विचारवंतांना एक छोटासा बोचरा प्रश्न -
"नेपाळमध्ये दर 5 वर्षांनी होणाऱ्या हिंदूंच्या 'गढीमाई' यात्रेत बळी दिल्या जाणाऱ्या किमान 200,000 जनावरांच्या रक्ताच्या पाटाचे आणि पडलेल्या मांसाच्या ढिगाचे काय? या यात्रेला बिहारमधून नेल्या जाणाऱ्या पशूंचे काय??"
हिंदुत्ववाद्यांनो उगीच हर्षवायू होऊन नाचू नका!! आणि पुरोगाम्यांनी थोडा अभ्यास करावा, बरे असते!!!

- फेसबुक पोस्ट ( १७ सप्टेंबर २०१६, १२.५१ ) 

No comments:

Post a Comment