Wednesday, January 4, 2017

Indigo

Indigo ने केलेल्या काही छान गोष्टी -

१) विमानात दिली जाणारी फुकटची चॉकलेट, नाश्ता, जेवण आदी खर्चिक चोचले बंद केले

२) लॉयल्टी पॉईंट्स रिवार्ड्स पूर्णतः बंद केले, त्यामुळे अजून खर्च कमी झाला

३) विमानात स्वच्छता ठेवण्यात खुद्द प्रवाशांची मदत घेतली, त्याद्वारे लँडिंग आणि पुढच्या टेक-ऑफ मधील वेळ कमी केला

४) बिझनेस क्लास हा प्रकार ठेवला नाही, सबब रिकाम्या सिटमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळले

५) रो नंबर 1, 12 आणि 13 मधल्या सीट्स जिथे जास्त leg-room असते त्या सीट्स अधिक पैसे घेऊन प्रवाशांना दिल्या

६) Web Check-in ची सोय देत प्रवाशांचा वेळ वाचवला, सोबत window आणि aisle सीट जास्त पैसे देऊन दिल्या

७) कमी प्रवासी असणाऱ्या मार्गांवर सेवा देणे टाळले

८) बहुतांश विमाने ही भाडेपट्टीवर घेतलीत, त्यामुळे balance sheet वर ताण नाही

९) प्रवाशांसाठी सर्वात महत्वाचे असणारे म्हणजे वेळेवर आगमन आणि वेळेवर प्रस्थान ह्या इतर एअरलाईन्स ना अवघड गेलेल्या गोष्टी Indigo ने साध्य केल्या

१०) तिकिटाचे दर बाजारात सर्वात कमी ठेवले

आश्चर्य नाही की Indigo ही एकमेव नफ्यात चालणारी भारतीय विमानसेवा आहे आणि प्रवासी खासगी असोत कि बिझनेसमेन, Indigo नेहमी त्यांचा पहिला चॉईस असते.

- डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १८ सप्टेंबर २०१६, १७.४८ ) 

No comments:

Post a Comment