जैन समाजा सारख्या सधन समाजात जन्म घेऊनही गरिबांच्या, दलितांच्या
मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वस्व देऊन खेडोपाडी शाळा, कॉलेज काढणारे
शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर अण्णा!
स्वतः अल्पशिक्षित असूनही गरीब मुलांना शिक्षणासाठी Oxford University मध्ये पाठवणारे आणि त्यांच्या ह्या महान कार्यात मदत म्हणून स्वतःचे मंगळसूत्र सुद्धा विकणाऱ्या लक्ष्मीबाईंचे खरे सौभाग्य असणारे अण्णा!
"महाराष्ट्रातील शेवटचे मूल शाळेत जाईल तेव्हा मी चप्पल घालेन" म्हणून प्रतिज्ञा करणारे आणि आयुष्यभर अनवाणी चालणारे अण्णा!

4 वर्षांच्या पीजी पाटील यांना खांद्यावर बसवून नेऊन शिक्षण देणारे कोमल
हृदयाचे अण्णा आणि गव्हर्नरने वैयक्तिक द्वेषातून शाळांची ग्रँट बंद केली
तेव्हा त्याला प्रसंगी मारण्याची तयारी करून गेलेले कणखर अण्णा!
शाहू, बाबासाहेब आणि गाडगेबाबा यांच्या सोबत मिळून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा वाहवणारे भगीरथ अण्णा!
असंख्य पाखरांना एक सुंदर आयुष्य देणारे वटवृक्ष अण्णा!
- डॉ. विनय काटे
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन _/\_
- फेसबुक पोस्ट ( २३ सप्टेंबर २०१६, ०९.३८ )

No comments:
Post a Comment