शरीररचनाशास्त्र (Anatomy) च्या पुस्तकात माणसाच्या वंश, धर्म-जाती नुसार नसतो एकही वेगळा अवयव किंवा रचना,
Dissection table वर ठेवलेलं cadaver (प्रेत) फक्त स्त्री किंवा पुरुष एवढीच सांगते ओळख,
जन्माला आलेलं प्रत्येक बाळ तितकंच निरागस, सुंदर आणि नसते त्याच्या शरीरावर धर्म ओळखायला एकही खूण,

पोस्ट मॉर्टेम च्या टेबलवरचे प्रत्येक प्रेत असते तितकेच निश्चल, जिवंतपणीचे सगळे राग-लोभ-द्वेष-मत्सर विसरलेले,
आजारी पडलेला प्रत्येक देह असतो तितकाच त्रासलेला, व्याधींनी पिचलेला आणि मनाने खचलेला,
एका आजारासाठी जगातील समस्त जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना लागू पडतं एकचं औषध,
राष्ट्रीयता-जाती-धर्म कुठलाही असो, रक्ताचा रंग लालच आणि रक्तदानाने खेळते ते एकमेकांच्या धमन्यात,
कुठल्याही जाती-धर्माच्या पुरुषाचा शुक्रजंतू, कुठल्याही स्त्रीच्या बीजाचे फलन करून जन्माला घालतो तोच माणूस,
प्रत्येक माणसाची वेदना सारखी, अश्रू सारखे आणि सगळ्यांचे हास्यही तितकेच मोहक,
माणसा-माणसात एकही भेद मला तरी दिसत नाही, तुम्हालाच का दिसतात देश-वंश-जात-धर्माच्या भिंती???
- डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २२ सप्टेंबर २०१६, २२.४४ )

No comments:
Post a Comment