Wednesday, January 4, 2017

दयामरण

जर मी कुठल्या अपघातात ब्रेन डेड झालो, स्ट्रोक होऊन अंथरुणाला कायमचा खिळलो किंवा काही कारणांनी कायमचा ठार वेडा मनोरुग्ण झालो, आणि माझे पुढचे आयुष्य हे कुठलेही सृजन, उत्पादन न करता कुटुंबावर, समाजावर आर्थिक, शारीरिक, मानसिक ताण आणणार असेल ... तर, माझ्या तमाम डॉक्टर मित्रांनी भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस देऊन मला शांत आणि तत्काल मरण द्यावे. नंतर अवयव/देह दान वगैरे करावेच शक्य असल्यास.

माझ्या आधीही हे जग चालू होते, माझ्या नंतरही हे जग चालेल. उगीच बिनकामाचे खर्च आणि त्रास कुणाला होऊ नयेत. मला अर्थपूर्ण आयुष्य जगायचंय, निरर्थक अस्तित्व चुकूनसुद्धा नको! मरणासन्न अवस्थेत दयामरण मागण्यापेक्षा, सर्वकाही व्यवस्थित असताना हे विचार व्यक्त करणे जास्त योग्य आहे, किमान माझ्या पुरते तरी !!!


पाश्चिमात्य जगात पेशंट DNR ची इच्छा व्यक्त करू शकतो, म्हणजे त्याच्यावर life support system न वापरायची. मीही तेच बोलतोय कारण वरच्या सगळ्या परिस्थितीत मला इच्छा व्यक्त करता येणार नाहीये.

- फेसबुक पोस्ट ( १६ सप्टेंबर २०१६, ०१.२६ ) 

No comments:

Post a Comment