Wednesday, January 4, 2017

IIM Ahmedabad

IIM Ahmedabad मधली फक्त पहिल्या 45 दिवसांच्या (slot-1) अभ्यासक्रमाची ही पुस्तके .... असे 6 slot होते पहिल्या वर्षी. पहिल्या वर्षाची पुस्तके एकावर एक अशी रचली तर साधारण 7 फूट उंच टॉवर बनायचा. मुले-मुली कौतुकाने तसा पुस्तकांचा ढीग रचून सोबत आपला फोटो काढून घ्यायचे.

Accounts, Finance, Marketing, Operations, HR, Probability and statistics, Economics (Micro & Macro), Information systems, Managerial Computing, Written analysis and communication, Strategy etc. काय शिकवलं नाही 1st year ला! 2nd year ला परत तेवढीच पुस्तके आणि अजून असंख्य नवे विषय... Game Theory पासून ते Intellectual Property Rights पर्यंत!!

No automatic alt text available.

लोकांना IIM वाल्यांच्या salary चे आकडे पेपरात कळतात, पण त्यांचे hardwork, knowledge आणि skills क्वचितच माहित असतात. बाकीच्या MBA कॉलेजेस सारखे HR specialization म्हणजे फक्त HR चं शिकायचं असा प्रकार इथे नसतोच मुळी. IIM ला specialization हा प्रकारच नसतो, 1st year सगळे विषय compulsory आणि 2nd year ला electives. त्यामुळे 1st year मध्ये अक्षरश: तावून सुलाखून काढले जाते विद्यार्थ्याला सारे विषय शिकवून! उद्देश हाच असायचा कि प्रत्येक विद्यार्थी भविष्यात CEO बनण्यासाठी तयार असावा, management चे सगळे fundamentals कोळून पिऊन.

डॉक्टर आहे, गणित फक्त 12वी पर्यंत शिकलाय किंवा commerce ला नव्हता म्हणून कसलीही सूट नव्हती. IIT मधून आलेल्या मुलांच्या बरोबरीने Probability and statistics सोडवावे लागायचे, Visual Basics मध्ये coding करायचं आणि CA/CFA झालेल्या लोकांएवढे accounts/finance पण सहज आले पाहिजे..... कारण relative grading! आणि अस अजिबात नव्हतं की आपल्या graduation stream शी संबंधित विषयातच आपण चमकू. Neurosciences and consumer behaviour मध्ये मला B ग्रेड मिळाली, तर Information Systems for Business विषयात मी A+ ग्रेड घेऊन अख्ख्या बॅच मध्ये पहिला होतो, 370 विद्यार्थ्यांत!

एखाद्या विषयात बॅचच्या तुलनेत तुम्ही खूपच मागे असला की D किंवा F ग्रेड मिळायची. पाच D किंवा दोन F मिळाले की निघा घरी!! या D आणि F च्या भीतीत अभ्यास करत अख्ख वर्ष जायचं. जेव्हा 1st year पास व्हायचो तेव्हा अख्खी बॅच 'PGP Survivor' लिहिलेले टीशर्ट घालून फोटो काढून बेभान होऊन नाचायची. 'जर PGP-1st year पास करू शकतो तर जगात काहीही करू शकतो' हा आत्मविश्वास तेव्हा जो मिळतो तो आयुष्यभर टिकतो!!

5 वर्षापूर्वीच्या memory मधला हा फोटो फेसबुक ने दाखवून परत एकदा nostalgic करून टाकले!!

- फेसबुक पोस्ट ( ३० सप्टेंबर २०१६, ०१.०७ )

No comments:

Post a Comment